Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळून ५ ठार

अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळून ५ ठार

वेबदुनिया

इटानगर , मंगळवार, 19 एप्रिल 2011 (17:59 IST)
अरूणाचल प्रदेशातील तवांगमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पाच जण ठार तर नऊजण जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १८ प्रवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी गुवाहाटी विमानतळावरून उड्डाण केले होते. तवांग येथे एका टेकडीवर असलेल्या हेलिपॅडवर उतरताना त्याला अचानक आग लागली, आणि ते दरीत कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन मुले आणि पाच कर्मचाऱ्यांसह १८ प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi