Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्णव गोस्वामींना जीवे मारण्याची धमकी

अर्णव गोस्वामींना जीवे मारण्याची धमकी
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (10:06 IST)
पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने ‘टाइम्स नाऊ’ या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 
 
‘न्यूज अवर’ या कार्यक्रमात उरी हल्ल्यानंतर गोस्वामी यांनी पाकिस्तान सरकार आणि तेथील दहशतवादी संघटनांवर कडाडून टीका केली. त्यानंतर गोस्वामी यांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 
 
धमकीनंतर गोस्वामींच्या सुरक्षेसाठी २० सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये दोन सुरक्षा अधिकाऱयांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतीसाठी निवडणूका जाहीर