Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव राज्यसभेवर

अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव राज्यसभेवर
दिल्ली , सोमवार, 25 एप्रिल 2016 (11:36 IST)
प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी व डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ असून, ते नियोजन आयोगावर होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवरही होते. त्यांच्यामार्फत दलित समाजाला पक्षाजवळ आणण्याची भाजपाची इच्छा आहे. स्वपन दासगुप्ता यांच्या नियुक्तीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली प्रयत्नशील होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi