Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंतरराष्ट्रीय योगदिनी सार्वजनिक सुटीची विनंती

आंतरराष्ट्रीय योगदिनी सार्वजनिक सुटीची विनंती
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय योगदिनी 21 जून रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी विनंती आयुषमंत्री श्रीपाद नाईक केंद्र सरकारला करणार आहेत.
 
गतवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन रविवारी असल्याने सुटीची मागणी कोणीही केली नव्हती. योगा प्रोटोकॉल - 2016 यंदाही आयुष मंत्रालयाने तयार केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. योगासाठी साधारणपणे सकाळी 7 ते 8 ही वेळ ठरविण्यात आली आहे. योगामध्ये ‘ओम्’ म्हणण्याची यंदाही सक्ती नसल्याचे व सूर्यनमस्कार घालणे सोपे नसल्याने प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट नसल्याचे मंत्रंनी स्पष्ट केले. यूजीसीने यंदा कॉलेजेस व विद्यापीठांना आयुष मंत्रालयाचा ‘योगा प्रोटोकॉल’ अमलात आणण्याची सूचना केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रोटोकॉलची सुरुवात संस्कृत श्लोकाने असून ओम चॅटिंगचाही समावेश आहे.
 
महाराष्ट्रात योगमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी 21 जून या दिवशी या आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योगदिन साजरा करण्याबाबतचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
 
राज्यात योगदिन साजरा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तावडे बोलत होते. 12 जानेवारी हा युवक दिन ते 21 जानेवारी या दरम्यान विविध ठिकाणी योग ङ्खेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाँच झाला सर्वात स्वस्त 4जी स्मार्ट फोन