Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंदोलनात राजकीय पक्षांना स्थान नाही : हार्दिक

आंदोलनात राजकीय पक्षांना स्थान नाही : हार्दिक
, सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (09:34 IST)
नवी दिल्ली पटेल समुदायाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात राजकीय पक्षांना स्थान देण्यात येणार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले.
 
पटेल आंदोलनाचा वणवा राजधानी दिल्लीपर्यंत पोचला असून हार्दिक पटेल आपल्या कार्यकर्त्यांसह जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलनात प्रवेश करू देणार नसल्याचे सांगितले.
 
हार्दिक पटेल म्हणाले, की आम्ही दिल्लीमध्ये कोणत्याही मंत्र्याला भेटायला आलेलो नाही. राजकीय पक्षांना आमच्या आंदोलनात स्थान नाही. आम्ही दिल्लीत भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी आलो आहोत. जाट आणि गुर्जर समुदायाच्या नागरिकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही आमचे आंदोलन देशभर पोचविणार आहोत. पटेल समुदायाला जे काही आवश्यक आहे, ते मी करण्यास तयार आहे. आमची 27 कोटी लोकसंख्या असून, आम्ही आरक्षणाच्या मागणीवर सर्वजण एक आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi