Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सुरू, असा घ्या फायदा

आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सुरू, असा घ्या फायदा
नवी दिल्ली , शुक्रवार, 3 जुलै 2015 (12:29 IST)
आजपासून देशभरात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी लागू होत आहे. म्हणजे आता देशाच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला मोबाइल नंबर बदलावा लागणार नाही. तोच नंबर पूर्ण देशात चालू शकेल. तोही रोमिंग शुल्काशिवाय. त्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. खर्चही फक्त १९ रुपये येईल. प्रीपेड व पोस्टपेड दोन्हींसाठीही ही सुविधा आहे. आजवर एकाच सर्कलमध्ये पोर्टेबिलिटीची मुभा होती.     
 
ही सुविधा कशी घेता येईल...
- मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन PORT टाइप करा. मग स्पेस देऊन तुमचा मोबाइल नंबर लिहा व १९००वर पाठवा.
- थोड्या वेळाने तुमच्या मोबाइलवर एक आठ आकडी युनिक कोड येईल.
- हा युनिक कोड पोर्टेबिलिटीच्या विहित नमुन्यात आणि ग्राहक अर्जाच्या फॉर्मसह कंपनीच्या आऊटलेटवर दाखल करावा.
- फॉर्म दाखल केल्यावर तुमच्या खात्यातून १९ रु. कपात होतील.
- त्यानंतर जुने बिल (बाकी असल्यास) भरावे लागेल आणि मग नवे सिम मिळेल.
- मग नेटवर्क शिफ्टिंगचा एसएमएस मिळेल व मोबाइल कंपनी बदलली जाईल.
- प्रीपेड युजर्स बॅलन्स ट्रान्सफर आणि पोस्टपेड युजर्स कॅरी फॉरवर्ड करू शकतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi