Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठ वर्षीय मुलीवर गँगरेप;जमावाने घेतला आरोपीचा जीव

आठ वर्षीय मुलीवर गँगरेप;जमावाने घेतला आरोपीचा जीव
कोलकाता , शुक्रवार, 25 जुलै 2014 (10:56 IST)
पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्याच्या कालीबाजार गावात एका आठ वर्षीय मुलीवर गँगरेप करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर संतप्त जमावाने एका संशयित आरोपीला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडितेचा मृतदेह शेतात सापडला. तिच्या वडिलांनी तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडिता बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला तरी ती सापडली नाही. गुरुवारी सकाळी घरापासून जवळच तिचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मुलीच्या घराजवळ राहणारा रतन दास व त्याच्या दोन साथीदारांनी बुधवारी रात्री सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले. नंतर नराधमांनी मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह झाडाला लटकवून दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi