Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता हरियाणा पोलिसांना मिळणार सुटी

आता हरियाणा पोलिसांना मिळणार सुटी
, सोमवार, 2 मे 2016 (17:21 IST)
चंदीगड- आता हरियाणा राज्यातील पोलिसांना आठवड्यातून एक सुटी मिळणार, ही घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली. 365 दिवस 24 तास कामासाठी सज्ज राहत असलेल्या पोलिसांना ताण येतो हे लक्षात घेऊन त्यांना साप्ताहिक सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे खट्टर यांनी सांगितले. 
 
खट्टर यांनी सांगितले की 2016 मध्ये 7 हजार 200 पोलिस कर्मचार्‍यांची भरती करण्यात येईल. जागा रिक्त असल्याने इतर कर्मचार्‍यांवर अतिरिक्त भार पडतो, असेही त्यांनी म्हटले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सईदच्या मदरशावर ग्रेनेडने हल्ला