Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदीबेन पटेल देणार राजीनामा

आनंदीबेन पटेल देणार राजीनामा
अहमदाबाद , मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (10:58 IST)
आपल्या वयाची 75 वर्ष पुर्ण झाली आहेत, आपण आता निवृत्त होऊ इच्छितो असं गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे.
 
मुख्यमंत्रीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आनंदीबेन पटेल पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. यासंबंधी पटेल यांनी फेसबुकवर  पोस्ट टाकली आहे.
 
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, पटेल समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन आणि नुकताच झालेला उना येथील दलितांवरील हल्ला यामुळे भाजपाची प्रतिमा गुजरातमध्ये मलीन झाल्याची टीका होत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या राजीनाम्याकडे पाहण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तराखंडमध्ये 14 हजार फूट उंचीवर पहिल्यांदाच दिसले वाघ