Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिरचे पाकिस्तानाचे तिकिट बुक

आमिरचे पाकिस्तानाचे तिकिट बुक
, गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (15:20 IST)
देशातील असहिष्णू वातावरणाबाबत अभिनेता आमीर खानने केलेल्या वक्तव्यावरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली असून हिंदू सेनाने तर सरळ त्याचे आणि त्याच्या कुटुंबियाचे पाकिस्तानाचे तिकिट बुक केले.  हिंदू सेनाने आमिर, त्याची पत्नी किरण आणि मुलगा आझाद यांच्यासाठी इस्‍लामाबादाचे तिकिट बुक केले आहेत.



 
तसेच शिवसेनाने आमिर खान याला एक चापट लावणार्‍याला एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. उल्लेखनीय आहे की असहिष्णू वातावरणाबाबत बोलताना आमिर म्हणाला होता, की मुलाबाळांच्या सुरक्षिततेने चिंतित पत्नी किरणने त्याला देशच सोडून जाऊ, असे म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi