Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरबीआयचे गव्हर्नर राजन यांना मारणची धमकी

आरबीआयचे गव्हर्नर राजन यांना मारणची धमकी
मुंबई , शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:22 IST)
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ठार मारण्याचा धमकीचा ईमेल आला आहे. दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या नावाने हा ईमेल त्यांच्या खासगी ईमेल अकाउंटवर पाठवला गेला आहे. मुंबई पोलिसांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आणि मुंबई पोलिसांचे सायबर सेलचे अधिकारी याचा तपास करत आहेत. 
 
या महिन्याच्या सुरूवातीला रघुराम राजन यांना हा ईमेल आला आहे. हा ईमेल येताच आरबीआयच्या अधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सह आयुक्तांकडे लगेचच तक्रार दाखल केली. 
 
राजन यांना हा ईमेल isis583847gmail.com वरून पाठवण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. संपूर्ण ईमेल मिळू शकलेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi