Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसारामची जेलमध्ये शाही बडदास्त

आसारामची जेलमध्ये शाही बडदास्त
जोधपूर , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:43 IST)
दुष्कर्मच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूला जेलमध्ये ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत आहे. त्यांच्या सेवेसाठी खास पाच ‘सेवेकरी’ ठेवण्यात आले आहेत. ते दररोज आसारामला ‘बॉडी मसाज’ करतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
अलीकडेच जेलमधून सुटून आलेल्या एका स्थानिक नेत्याने नाव न सांगणच्या अटीवर आसारामच्या या ‘शाही पाहुणचारा’चे बिंग फोडले. आसारामला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून तिथे त्याच्या थाट अजिबात कमी झालेला नाही. असा दावा या नेत्याने केला. कारागृहातील ज्या कोठडीत आसारामला ठेवण्यात आले आहे. त्याच्या बाजूच्याच कोठडीत या नेत्याला ठेवण्यात आले होते. त्यामुळे जामिनावर मुक्त झाल्यानंतर या नेत्याने आसारामला कारागृहातील दिवस कसा जातो, याचा ‘आँखो देखा हाल’ मीडिाला सांगितले.
 
असा आहे दिनक्रम 
आसारामचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. सर्वात आधी 45 मिनिटे धनधारणा आणि योगा झाल्यानंतर कारागृहातच तीन मिनिटे आसाराम ‘मॉर्निग वॉक’ घेतो. मग आसारामला असलेल्या त्रिनाडी शूल या आजारासाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. हे उपचार झाल्यानंतर मशीनच्या साहायने सेवेकरी 30 ते 45 मिनिटे आसारामच्या पूर्ण बॉडीचा मसाज करून देतात. मसाज झाल्यानंतर बापूची ‘स्वारी’ आंघोळीला जाते. मग स्वच्छ धुतलेले आणि कडक इस्त्रीचे कपडे बापू परिधान करतो. नाश्त्यात काजू बदाम, फळे, फळांचा ज्यूस  असा बेत असतो. हा जूस आसारामच आश्रमातून पाठवलेला असतो. नाश्ता झाल्यानंतर कोठडीबाहेर जाऊन आसाराम पुन्हा वॉक घेतो. मग अन्या कैद्यांशी या ‘महाशया’च्या गप्पा सुरू होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi