Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदिरा गांधीच शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू

इंदिरा गांधीच शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
दिल्ली , बुधवार, 23 मार्च 2016 (15:34 IST)
अमेरिकेत आत्तापर्यंत कोणतीही महिला राष्ट्रपती बनू शकली नाही, भारतात मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष ही तिनही प्रमुख पदं महिलांनी भूषवली' असे नमूद करत ' इंदिरा गांधी या देशातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान होत्या, असे मत भाजपा नेते व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी इंदिरा यांचे कौतुक केले. रेल्वेतही मोठ्या संख्येने महिला कर्मचारी असून त्या उत्तम रितीने काम करतात. भारतीय रेल्वेमध्ये १३ लाख कर्मचारी आहेत, त्यापैकी महिलांची संख्या सुमारे १ लाख आहे, महिला दिवस फक्त एका दिवसासाठी नसावा असे सांगत नवे संकल्प करून पुढे वाटचाल करावी, असेही प्रभू म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi