Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदूरमध्‍ये 4 क्विंटल विस्फोटक जप्‍त

इंदूरमध्‍ये 4 क्विंटल विस्फोटक जप्‍त

वार्ता

इंदूर, , सोमवार, 18 ऑगस्ट 2008 (19:19 IST)
इंदूर रेल्‍वे पोलिसांनी राबविलेल्‍या एका तपासणी अभियानात शहरातील एका भागात चार क्विंटलपेक्षाही जास्‍त विस्फोटक साहित्‍य आढळून आले आहे. इंदूर रेल्‍वे पोलीस स्‍टेशनचे प्रभारी अरविंद खरे यांनी सांगितले, की हा पदार्थ अमोनिया नायट्रेट असून तो चुरा अधिक तपासणीसाठी सागर येथील प्रयोगशाळेत पाठविण्‍यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्‍या गुप्‍त माहितीच्‍या आधारे महू येथील भीमराव नावाच्‍या तरुणास अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्‍याकडून अधिक चौकशी केल्‍यानंतर सावेर रोड येथील एका कारखान्‍यावर छापा आकून 19 पोत्‍यांमध्‍ये भरून ठेवलेले 4 क्विंटल विस्‍फोटक साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे.

याप्रकरणी भीमरावसह कारखान्‍याचा मालक पूनम बराल यासही अटक करण्‍यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi