Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंद्राणी मुखर्जी अखेर शुद्धीवर

इंद्राणी मुखर्जी अखेर शुद्धीवर
मुंबई , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:34 IST)
शीना बोरा खून प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी शुद्धीवर आली आहे. गेले तीन दिवस ती बेशुद्ध होती.

शुक्रवारी इंद्राणी पहाटे गीता वाचू लागली. त्यावेळी तिने भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तुरुंगात असलेले निवासी डॉक्टर्स केळणीकर आणि खान यांनी तिला तपासले. तिची प्रकृती खूपच बिघडल्यानंतर मानद डॉक्टर वकार शेख यांना बोलावण्यात आले. भायखळा तुरुंगात इंद्राणीला ठेवल्यानंतर लगेचच तिने निद्रानाश व भोवळ येत असल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या व्हिजिटिंग डॉक्टर सारिका दक्षीकर यांनी तिच्यावर झोपेच्या आणि अँटी डिप्रेशनच्या गोळ्यांचा उपचार केला होता.

दरम्यान, ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचे विधान जे.जे. इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी केले होते. मात्र, त्यांनी ते मागे घेतल्याने तुरुंगाधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जे.जे. इस्पितळाने पाठविलेल्या इंद्राणीच्या तीनपैकी एकाही नमुन्यात लहाने म्हणतात तशा प्रकारच्या कोणत्याही औषधाचा लवलेशही आढळला नसल्याचा स्पष्ट अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi