Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इटलीचे उपपरराष्ट्रमंत्री भेटले नाविकांना

इटलीचे उपपरराष्ट्रमंत्री भेटले नाविकांना

वेबदुनिया

कोची , शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2012 (16:40 IST)
भारतीय मच्छिमारांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या दोन इटालियन नाविकांना इटलीचे उपपरराष्ट्रमंत्री स्टीफन डे मिस्तुरा यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी नाविकांना भारतसरकारने उपलब्द करून दिेलेल्या कायदेशिर सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त केले, यावेळी त्यांच्यासोबत इटलीचे भरातातील राजनैतिक अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान या घटनेबाबत मिस्तुरा यांनी केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याशी देखील चर्चा केली. पण या चर्चेमध्ये मात्र उभय पक्षांमध्ये मतैक्य होवू शकले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi