Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ईव्‍हीएमने निकाल फिरवणे शक्य- तज्‍ज्ञांचा अहवाल

ईव्‍हीएमने निकाल फिरवणे शक्य- तज्‍ज्ञांचा अहवाल
नवी दिल्ली , शनिवार, 1 मे 2010 (10:16 IST)
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने (ईव्हीएम) निवडणूक निकालात फेरफार करून तो फिरवता येणे शक्य असल्‍याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या एका गटाने दिला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या एका गटाने या संदर्भात केलेल्‍या संशोधनानंतर हा निष्‍कर्ष सादर केला आहे.

मतदान यंत्रांशी छेडछाड करण्याची थोडी जरी संधी मिळाली, तर निवडणूक निकाल हवा तसा फिरवता येऊ शकतो. मतदान यंत्राच्या आराखड्याचा तपशील आजवर कधीच सार्वजनिक करण्यात आलेला नाही आणि यंत्राची निःपक्ष यंत्रणेद्वारा कठोर सुरक्षा चाचणीही घेण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर या निष्‍कर्षांना मोठे महत्त्व आहे.

भारतीय ईव्हीएममध्ये सुरक्षाविषयीचे गंभीर दोष असल्‍याचे तज्ज्ञांनी सिद्धच करून दाखवले आहे. हैदराबाद येथील नेटइंडिया लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि ईव्हीएमशी संदर्भातील मुद्यांसंदर्भातील तज्ज्ञ मानल्या जाणारी नेदरलॅण्डमधील एक स्‍वयंसेवी संघटनेच्‍या मदतीने केलेल्‍या संयुक्त संशोधनानुसार 14 लाख ईव्हीएम आहेत. त्या यंत्रांमध्ये केवळ कृत्रिम स्मृतीमध्ये मतदानाची नोंद होते.

एकदा मतमोजणी केल्यानंतर फेर तपासणी किंवा फेरमतमोजणी करण्‍यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री नोंद पुरविण्याची सोय या यंत्रांमध्ये नाही. केवळ यंत्रांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यावरच विश्वास ठेवावा लागतो.
ईव्हीएममधील केवळ खिशात मावू शकेल एवढा एक छोटासा भाग बदलून, एखाद्या विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने पडलेल्या मतांपैकी विशिष्ट टक्के मते चोरणे सहज शक्य असल्‍याचे या संशोधनात आढळून आले आहे. या बदललेल्या सुट्या भागाला मोबाईलवरूनही कंट्रोल करता येते. त्‍याशिवाय प्रत्‍यक्ष मतदानाचा आणि मतमोजणीचा दिवस या दरम्यानच्या काळातही या उपकरणाच्या साहाय्याने निकाल बदलता तो असा दावा तज्‍ज्ञांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi