डेहराडून- उत्तराखंडच्या पिठोरगड व छामोली जिल्ह्यामध्ये शुक्रवार पहाटे झालेल्या ढगफुटीत 20 जण ठार झाले असून काही जण बेपत्ता असल्याची बातमी आहे. मात्र, प्रशासनाने दोन्ही जागेवर 9-9 जण ठार झाल्याची घोषणा केली आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस व ढगफुटीमध्ये अनेकजण वाहून गेले आहेत. यामध्ये 30 नागरिकांसह 50 जनावरांचा समावेश आहे.
‘ढगफुटीमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची आशंका आहे. घटनास्थळी बचाव दलाचे जवान दाखल झाले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे,‘ अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली.
ढगफुटीत मरण पावलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.