Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एफिड्रिन ड्रॅग प्रकरणी ममता कुलकर्णी आरोपी?

एफिड्रिन ड्रॅग प्रकरणी ममता कुलकर्णी आरोपी?
ठाणे , शनिवार, 18 जून 2016 (11:46 IST)
2 हजार कोटी रुपयांच्या एफिड्रिन ड्रॅग रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीविरोधात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहे. आता आणखी पुरावे मिळाल्यानंतर ममता कुलकर्णीलाही आरोपी बनवलं जाऊ शकतं. या प्रकरणात ममताचा पती विकी गोस्वामी हा मास्टरमाईंड असल्याचं कळतं. 
 
कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं. 
 
या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं उल्लंघन : कृष्णप्रकाश