Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओडिशाचे पर्यटनमंत्री गोळीबारात गंभीर जखमी

ओडिशाचे पर्यटनमंत्री गोळीबारात गंभीर जखमी

वेबदुनिया

पुरी- ओडिशाचे पर्यटनमंत्री महेश्वर मोहंती शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या निवासस्थानाजवळच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. मोहंती यांच्या डाव्या खाद्याला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंती शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथून घरी परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर कार्यक्रम स्थळापासूनच त्यांचा पाठलाग करत होते. आमला क्लबजवळ मोहंतीवर गोळीबार झाला. मोहंतीच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. तेथून त्यांना भुवनेश्वरला हलवण्यात आले आहे.

मोहंती यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi