Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कन्हैया कुमारवर विमानतळावर हल्ला

कन्हैया कुमारवर विमानतळावर हल्ला
मुंबई , सोमवार, 25 एप्रिल 2016 (11:40 IST)
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर विमानतळावर हल्ला करण्यात आला. त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबईतील शनिवारची सभा झाल्यानंतर आज सकाळी 10च्या सुमारास कन्हैया मुंबईहून पुण्याला निघाला असताना मुंबई विमानतळावरच मानस नावाच्या व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कन्हैयासोबत असलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी त्याला हल्लेखोराच्या ताब्यातून सोडवलं, मात्र त्यानं पुन्हा कन्हैयावर हल्ला करायचा प्रयत्न केला. कन्हैया आणि त्याच्या साहकार्‍यांनी या संदर्भात सुरक्षा अधिकार्‍यांकडे तक्रार केली.
त्यानंतर या दोघांनाही विमानातून खाली उतरवण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi