Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमळाचे बटन जोरात दाबा म्हणजे इटलीत करंट बसेल : शहा

कमळाचे बटन जोरात दाबा म्हणजे इटलीत करंट बसेल : शहा
चंदीगड , मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (11:50 IST)
मतदारांनी कमळाचे बटन इतक्या जोरात दाबावे की त्याचा करंट थेट इटलीत बसेल, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हरिाणातील प्रचार सभांमध्ये केले.
 
गेली 20 वर्षे राज्यात हुडा आणि चौताला यांनी आळीपाळीने राज्य केले. एकाने येऊन भ्रष्टाचार करायचा तर दुसर्‍याने गुंडगिरी करीत भ्रष्टाचारावर पांघरूण घालायचे हा प्रकार सातत्याने चालू आहे. आता जर हरिाणातील जनतेने आम्हाला सत्ता दिली तर आम्ही भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू, असा दावा शहा यांनी केला.
 
काँग्रेसवाले आणखी एक संधी मागत आहेत मात्र त्यांना सलग दोनवेळा संधी देऊनही त्यांनी नेमके काय केले, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. राज्याचा सर्वागीण विकास होण्यासाठी भाजपला संधी देण्याचे आवाहन करून शहा म्हणाले की, चौतालांच्या राज्यातील गुंडगिरी आणि काँग्रेसच्या राज्यातील गैरव्यवहारांना हरियाणातील जनता कंटाळली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi