Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेसच्या रंजीत रंजन बाइकवरून संसदेत

काँग्रेसच्या रंजीत रंजन बाइकवरून संसदेत
नवी दिल्ली- जागतिक महिला दिनानिमित्त महिला खासदार रंजीत रंजन ‘हर्ले डेव्हिडसन’ नावाच्या बाइकवरून संसदेत दाखल झाल्या होत्या.
 
काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन या बाइकवरून संसदेत आल्यामुळे त्यांनी लक्ष वेधून घेतले. एक महिला दुचाकी चालवू शकत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
रंजन या बिहारमधील सुपौलच्या खासदार आहेत. त्यांचा पप्पू यादव यांच्याशी विवाह झाला आहे. अनेक दिवसांपासून ही बाइक चालवत आहेत. या बाइकवरून एक छोटी फेरी मारली आहे, असे रंजन म्हणाल्या.
 
दरम्यान, ‘हर्ले डेव्हिडसन’ ही अमेरिकन महागडी बाइक आहे. या बाइकचे वजन 300 किलो असून, 1600 सीसीचे इंजिन आहे. तिची किंमत 11 लाख एवढी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi