Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जवान शहीद
श्रीनगर , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (17:16 IST)
जन्मु-काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात आज (शनिवारी) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवानांमध्ये चकमक झाली. त्यात एक जवान शहीद झाला. तसेच एक जवान गंभीर जखमी झाला आहे. 
कुपवाडा जिल्ह्यातील कालारूस जंगल क्षेत्रातही दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये गोळीबार सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, केरन सेक्टरमध्ये आज सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. तीन दहशतवाद्यांकडून हा गोळीबार करण्‍यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi