Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीरला वादळाचा तडाखा

काश्मीरला वादळाचा तडाखा

वेबदुनिया

श्रीनगर , बुधवार, 21 मार्च 2012 (17:16 IST)
जम्मू आणि काश्मीरला शक्तिशाली वादळाने तडाखा दिला असून श्रीनगरमधील अनेक घरांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हिमकडा कोसळण्याच्या घटनांमध्ये घट होऊन काही दिवस जात नाहीत तोच जम्मू आणि का‍श्मीरला वादळाने तडाखा दिला आहे. पोलिसांनी सुप्रसिद्ध दल सरोवरातील हाऊसबोटमध्ये राहणार्‍या अनेक पर्यटकांना सुरक्षितस्‍थळी ह‍लविले आहे. ट्रेकिंगला न जाण्याची सूचना पर्यटकांना देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi