Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरण बेदी भाजपच्या मुख्मंत्रिपदाच्या उमेदवार

किरण बेदी भाजपच्या मुख्मंत्रिपदाच्या उमेदवार
नवी दिल्ली , मंगळवार, 20 जानेवारी 2015 (10:29 IST)
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी याच दिल्लीच्या मुख्मंत्रिपदाच्या उमेदवार आहेत, अशी घोषणा सोमवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्री अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.
 
भाजप दिल्ली विधानसभेच्या निवडणुका बेदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे, असे सांगून शहा म्हणाले की, बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देणत आली आहे.
 
किरण बेदी यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे पक्षनेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे, या वृत्ताचा शहा यांनी इन्कार केला आहे. भाजपच्या   संसदीय मंडळाची बैठक नवी दिल्लीत झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
या बैठकीनंतर अमित शहा यांनी 65 वर्षीय किरण बेदी यांच्या नावाची घोषणा मुख्मंत्रिपदाचे उमेदवार म्हणून केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi