Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन

वेबदुनिया

कानपूर , सोमवार, 23 जुलै 2012 (14:49 IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहयोगी असलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे दीर्घ आजाराने सोमवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. लक्ष्मी सहगल यांना १९ जुलै रोजी हृदयविकाराचा धक्का बसल्याने कानपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे उपचारांदरम्यान त्यांना पुन्हा ब्रेन हॅमरेजचाही सौम्य झटका बसला. त्यामुळे त्यांना रुग्णालयातील जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi