Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केजरीवाल यांनी चूक मान्य केली

केजरीवाल यांनी चूक मान्य केली
, शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (17:49 IST)
नवी दिल्ली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गजेंद्रच्या मृत्युबाबद म्हटले की मी माझी चूक मान्य करतो आणि अता सर्वांना आवाहन करतो की याविषयावरील चर्चा थांबवून शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चर्चा करावी.

जंतरमंतर येथील आम आदमी पक्षाच्या रॅलीदरम्यान गजेंद्र नावाच्या एका शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यावर देशभर खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, व्यासपीठापासून झाड जवळ होते परंतु त्यावर बॅनर्स लावलेले असल्याने आम्हाला काही दिसत नव्हते. मात्र तिकडे काहीतरी गडबड चालू असल्याचे जाणवले. त्यावेळी तिथे काही स्वयंसेवक आणि पोलिस होते. पण कोणालाही तो आत्महत्या करेल असे वाटले नव्हते.

केजरीवाल यांनी हे मान्य केले की त्यावेळी मला बोलणे थांबवायला हवे होते. त्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मीडियावर टीका करत म्हटले की गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या नाटकाने जर तुमचा टीआरपी वाढत असेल तर ते सुरूच ठेवा. तसेच या घटनेनंतर मी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi