Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकणातही 'पॅसिफिक' सागरी मार्ग : गडकरी

कोकणातही 'पॅसिफिक' सागरी मार्ग : गडकरी
दिल्ली , शनिवार, 23 जुलै 2016 (11:20 IST)
अमेरिकेतला लॉस एंजिलिस ते सँनफ्रान्सिस्को असा पॅसिफिक सागरी मार्ग कोकणातही तयार व्हावा यासाठी किनारी रस्ता बांधण्याचा निश्चय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटींचे वार्षिक बजट केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात येत्या 5 वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते बांधारणार असल्याचं गडकरींनी जाहीर केलं.

गडकरी यांनी यापूर्वीही औरंगाबाद, वर्धा येथील कार्यक्रमात मराठवाडा आणि विदर्भातील रस्त्यांसाठी मोठा निधी जाहीर केला होता. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठीही निधीची घोषणा केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठवाड्यातील 100 मुस्लीम युवक इसीसमध्ये?