Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोठे आहे ओबीसी पंतप्रधान : लालू

कोठे आहे ओबीसी पंतप्रधान : लालू
पाटणा (बिहार)- आरक्षणाच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘कोठे आहे छाती बडवणारा ओबीसी पंतप्रधान?’ अशा प्रश्न उपस्थित करत मोदींवर टीका केली आहे.
 
लालूप्रसाद यादव यांनी टिटरद्वारे म्हटले, ‘भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ब्राह्मणवादी संघटनेचे अपत्य आहे. दलितांच्या विरोधक भाजपला मागासवर्गीय त्यांचा हक्क घेऊन देणार नाहीत.’ एकामागोमाग केलेल्या टिटमध्ये लालूप्रसाद यांनी पुढे म्हटले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशार्‍यावर स्मृती इराणी यांनी केंद्रीय विद्यापीठांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे आरक्षण संपुष्टात आणले आहे. देशातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक ओसीबी प्रवर्ग भाजप, संघाचा अन्याय सहन करणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वच्छ भारत मोहिमेत बायकोला जिवंत पुरले...