Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकातामधील चॅटर्जी बिल्डिंगला भीषण आग

कोलकातामधील चॅटर्जी बिल्डिंगला भीषण आग
कोलकाता , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:09 IST)
कोलकातामधील पार्क स्ट्रीट भागातील चॅटर्जी बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली आहे. 16 व्या मजल्यावर भीषण आग भडकली आहे. बिल्डिंगमध्ये अनेक जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही आग लागली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 मजल्याच्या चॅटर्जी बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बचाव पथकाला अनेक अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त बिल्डिंगमध्ये अडकलेले लोक कपडे दाखवून मदतीसाठी हाक मारत आहेत. आग पसरल्याने नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहे. अग्निशमन दलाचे जवान बाहेरुनच आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या बिल्डिंगमध्ये शेकडो कार्यालये आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi