Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गडकरींच्या घरी हेरगिरीचे मशिन; इंग्रजी दैनिकाचा गौप्यस्फोट

गडकरींच्या घरी हेरगिरीचे मशिन; इंग्रजी दैनिकाचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली , सोमवार, 28 जुलै 2014 (10:29 IST)
केंद्रीय परिवहनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या शासकीय बंगल्यात अद्ययावत रेकॉर्डिंग मशीन आढळून आल्याचा दावा एका एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरींच्या बंगल्याची झाडाझडती घेण्यात आली. त्यात हे रेकॉर्डिंग मशीन आढळून आल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. नंतर हे उपकरण तात्काळ काढून टाकण्यात आले होते. प्रारंभिक तपासानुसार ही यंत्रे विदेशी बनावटीची असून पाश्चिमात्य देशांत हेरगिरीसाठी याचा वापर केला जातो. विशेषत: अमेरिकेच्या सीआयए व एनएसए या संस्था अशी उपकरणे वापरतात. दरम्यान, स्वत: गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना याबाबत कल्पना दिली असल्याची माहितीही समोर आली आहे. 
 
रेकॉर्डिंग मशीन सापडल्याचे वृत्त गडकरी यांनी फेटाळून लावले आहे. ही अफवा असल्याचे गडकरी यांनी 'ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi