अहमदाबाद (हिं.स)- महाराष्ट्रातील वटसावित्रीच्या पूजेच्या धरतीवर उत्तर भारतात महिला करवा चौथ साजरा करतात. पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी हा उपवास केला जातो. तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. पण यात विशेष हे आहे की यावर्षी अनेक समलैंगिक संबंध ठेवणार्या म्हणजे 'गे' लोकांनीही आज करवा चौथचा उपवास केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या उत्सवाच्या तयारीसाठी त्यांची जोरदार शॉपिंग केली. अहमदाबाद येथील २६ वर्षीय तन्मय हा या गे लोकांपैकीच एक. आज करवा चौथच्या दिवशी त्याने आपल्या जोडीदारासाठी उपवास केला आहे. आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतानाच, पुढचा जन्म स्त्रीचा मिळावा अशीही प्रार्थना गे व्यक्ती करणार आहेत. २९ वर्षीय इंजिनियर असलेल्या दीपकनेही आपल्या बॉय फ्रेंडसाठी उपवास धरला आहे.
याबाबत विचारले असता गे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली की करवा चौथचा उपवास हे निव्वळ निमित्त असून यानिमित्ताने गे संबंधांना मान्यता मिळावी, हा त्यामागचा खरा प्रयत्न आहे.