Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुर्जर आंदोलनाचा वणवा देशभर पसरला

गुर्जर आंदोलनाचा वणवा देशभर पसरला
PTIPTI
गुर्जर समुदायाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात यावा अशी मागणी करत गेल्या आठवड्याभरापासून संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता देशभर पसरत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजधानी दिल्लीसह जम्मू- काश्मीर मधील गुर्जर समुदायानेही या आंदोलनात उडी घेतली आहे.

दिल्ली जम्मू मार्गावरील सारी वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत करण्याचा इशारा काल जम्मूतील गुर्जर नेत्यांनी दिला आहे. यानंतर राजधानीसह सर्वच मार्गावर पोलिस बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi