Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोळी माझ्यावर चालवा, दलितांवर नको : मोदी

गोळी माझ्यावर चालवा, दलितांवर नको : मोदी
हैदराबाद : दलितांवर हल्ला न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  हैदराबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत केलं आहे. दलितांना त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं मोदींनी बजावलं आहे. गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नको, असं भावनिक आवाहन करत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
 
गुजरातमधील उनामध्ये गाईचं मांस बाळगल्याच्या संशयावरुन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर काल पहिल्यांदाच मोदींनी मौन सोडलं. बनावट गोरक्षकांपासून सावध राहण्याचा इशारा मोदींनी दिला. हे ढोंगी आणि बनावट गोरक्षक समाज आणि देशात दुफळी माजवू पाहत आहेत. अशा व्यक्तींना दंड ठोठावण्याचा सल्ला पंतप्रधानांनी संबंधित राज्यांना दिला आहे. पशुधन ही देशाची संपत्ती असून गोरक्षणाच्या नावाखाली समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित