Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालत्या रेल्वेत टिसीवर वार

चालत्या रेल्वेत टिसीवर वार
नाशिक , शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:17 IST)
शालीमार एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी हल्ला केल्याने तिकीट निरीक्षक (टिसी) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तिकीट मागितले म्हणून प्रवाशांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
 
तिकीट निरीक्षक चुनीलाल गुप्ता यांनी दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना दार लावून घेण्यास सांगत तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर गुप्तांनी त्यांना जनरल बोगीत जाण्यास सांगितले असता त्या प्रवाशांना राग आणि एकाने गुप्तांच्या चेहे-यावर वस्तार्‍याने वार केले. त्यामुळे गुप्ता गंभीर जखमी झाले . देवळाली स्टेशनजवळ इतर प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi