Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
, सोमवार, 29 जून 2015 (09:34 IST)
नवी दिल्ली/पुणे- नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनने विश्रांती घेतल्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेगाने होऊ लागले आहेत. वातावरणात उकाडा जाणवू लागल्याने पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. 
 
आयएमडीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा पाऊस जुलैमध्ये सरासरीपेक्षा आठ आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा दहा टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. पण, जुलै आणि ऑगस्टमध्ये जून महिन्याप्रमाणे चांगल्या पावसाची अपेक्षा नाही. त्याबरोबरच मान्सूनपूर्व पाऊस काही भागांमध्ये चांगला झाल्याने एवढी अडचण येणार नाही.
 
आयएमडीच्या अगदी उलटा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तविला आहे. स्कायमेटने जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 104 टक्के आणि ऑगस्टमध्ये सरासरीएवढा म्हणजे 99 टक्के पाऊस पडेल असे म्हटले आहे. आयएमडीने यावर्षी सरासरीपेक्षा कमी म्हणजे 88 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविलेला आहे. मात्र, जूनमध्ये सरासरीपेक्षा 28 टक्के जास्त पाऊस झालेला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi