Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन
पुणे , मंगळवार, 27 जानेवारी 2015 (08:32 IST)
ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी २६ जानेवारी २०१५ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांचे निधन झाले. रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे त्यांचे पूर्ण नाव होते. २४ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसुर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. अतिशय सुशिक्षित आणि समृद्ध अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मोठे बंधु प्रसिध्द लेखक आर.के नारायण यांनी त्यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले. पुढे मुंबईतील सर जे.जे. कला माहाविद्यालयात व्यंगचित्रकलेसाठी त्यांना प्रवेश नकारण्यात आला होता. पुन्हा म्हैसुर येथे जाऊन त्यांनी बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मुंबईत आल्यावर अनेक नावाजलेल्या वर्तमानपत्रांतून आपल्या व्यंगचित्रांची भुरळ वाचकांवर कायम ठेवली. त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमनमॅगॅसेसे आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. 
 
कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. त्याचप्रमाणे 'टनेल ऑफ टाइम' हे आत्मचरित्र मराठीत ' लक्ष्मण रेषा' म्हणून प्रसिद्ध आहे. २०१० साली झालेल्या पक्षघाताने त्यांना नीट बोलता येत नव्हते. परंतू त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या रेखाटनामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi