Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाकीरपासून 55 दहशतवादी प्रेरित!

झाकीरपासून 55 दहशतवादी प्रेरित!
दिल्ली , मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (11:09 IST)
झाकीर नाईकच्या भाषणापासून प्रेरित होऊन तब्बल 55 जण दहशतवादाकडे वळले असल्याचे समोर आले आहे. या 55 जणांनी दहशतवादाकडे वळण्यात झाकीरने मोठी भूमिका निभावलेली आहे.
 
ढाकामधील हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी रोहन इम्तियाजने आपल्या फेसबुक पेजवर झाकीर नाईकच्या भाषणांपासून प्रेरित होऊन, याकडे वळल्याचे पोस्ट केले. यानंतर झाकीर नाईक प्रकाशझोतात आला होता. पण आता झाकीरपासून प्रेरणा घेतलेले हे दहशतवादी विविध दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आयसिस, लष्कर, इंडियन मुजाहिदिन, आणि सिमीसारख्या प्रमुख संघटनांचा समावेश आहे. या लीस्टमध्ये आयसिसची हस्तक महिला अफशा जबानी, आयएसशी संबंधित अटकेत असलेला मुदब्बीर शेख, मोहम्मद अब्दुल्ला खान, अबू अनस आणि महम्मद नफीस खान आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इंडियन मुजाहिदिनचा कतील अहमद सिद्दीकी आणि सिमी समर्थक बीजू सलीमही झाकीरच्या भाषणांनी प्रेरित होते. जमात-उल-मजाहिदिन बांग्लादेशता संचालक असदुल्लाह अली आणि रफीक इस्लाम हेही झाकीरची भाषणे ऐकत होते.
 
त्यामुळेच 2012 आणि 2013 मधील झाकीरच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाकीर विरोधात धार्मिक भावनांना चिथवणी देणे, दोन समुदायांमध्ये असंतोष निर्माण करणे आदी गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे झाकीर विरोधात सबळ पुरावे मिळवण्यासाठी सुरक्षा एजन्सी कार्यरत आहेत. झाकीर विरोधात कोणता गुन्हा नोंद होऊ शकतो? याची पडताळणी गृह मंत्रालय करत आहे. यासाठी चौकशी करणाऱ्या संस्थेने अधिक खोलात जाऊन तपास केला असता, गेल्या 10 वर्षात अटक झालेल्या दहशतवाद्यांपैकी 55 दहशतवादी झाकीरपासून प्रेरित असल्याचे समोर आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरसिंगची बंदी नाडाने उडविली