Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टू-जी घोटाळ्यात सोनियांचा जावई

टू-जी घोटाळ्यात सोनियांचा जावई

वेबदुनिया

, सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (11:18 IST)
टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचाही सहभाग आहे, त्यामुळे पी. चिदंबरम यांच्या भूमिकेची सी.बी.आय. चौकशी करावी, अशी मागणी जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रॉबर्ट वडेरा यांचे नाव न घेता चिदंबरम यांच्यानंतर सोनिया यांच्या जावयाचा क्रमांक असेल, असे स्वामी यांनी सांगितले. वेळ आल्यावर मी सर्व काही सांगेन, असेही त्यांनी प्रत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.


Share this Story:

Follow Webdunia marathi