Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विटरवरुन शोभा डे यांचा भारतीय पथकावर निशाणा

ट्विटरवरुन शोभा डे यांचा भारतीय पथकावर निशाणा
मुंबई , मंगळवार, 9 ऑगस्ट 2016 (10:49 IST)
भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी केला. त्यानंतर देशभरातल्या ट्विटराईट्सकडून शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे.

ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला. प्रसिद्ध लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली आहे. डे या आपल्या ट्विट्सनी नेहमीच वादात राहिल्या आहेत. याआधी मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाईमला मराठी सिनेमा दाखवण्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यानंतर शोभा डे यांनी फडणीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचं असल्याचा आरोपही केला होता. 
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गाय फक्त दूध देते : लालू प्रसाद