Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डीजीपी अनामी रॉय यांना हटविण्याचे आदेश

डीजीपी अनामी रॉय यांना हटविण्याचे आदेश

वेबदुनिया

चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलत पोलिस महासंचालकपदी ए एन रॉय यांची नियुक्ती केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रॉय यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने या प्रकरणी गांभीर्याची भूमिका घेत चार आठवड्यात नवीन महासंचालकांची या पदावर नियुक्ती करावी असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

केंद्रीय प्राशासनिक लवादाने (कॅट) ऑक्टोबर 2008 मध्ये रॉय यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली होती. राज्य सरकारने त्यावेळीही रॉय याना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॅटने सरकारचे म्हणणे खोडून काढत आपला निकाल सुनावला होता. यानंतर आज उच्च न्यायालयाने रॉय यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi