Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डुक्कर पळविण्यासाठी हनी सिंगची गाणी

डुक्कर पळविण्यासाठी हनी सिंगची गाणी
, गुरूवार, 3 डिसेंबर 2015 (13:10 IST)
डेहराडून- नैनिताल येथील शेतकर्‍यांनी केलेल्या सर्व प्रयत्नानंतरही जेव्हा ते आपल्या शेतातून जंगली डुक्कर आणि इतर जनावरे पळविण्यात अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी एक वेगळा उपाय शोधून काढला. आता या शेतकर्‍यांची मदत प्रसिद्ध गायक हनी सिंग करत आहे.


 
शेतकरी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात हनी सिंगची गाणी वाजवत आहे, ज्याने जंगली डुक्करच नव्हे तर इतर जनावरेसुद्धा शेतापासून लांब पळ काढतायेत. या उपायाने शेतकर्‍यांना फार मदत झाली आहे नाहीतर या डुकरांची दहशत एवढी वाढली होती की राज्य सरकाराने त्यांना मारण्याचे आदेश दिले होते.
 
एका शेतकर्‍याने सांगितले की आम्ही ऐकले होते की जंगली डुक्कर माणसांपासून लांब राहतात. यावर आम्ही विचार केला की शेतात गाणी वाजवली तर डुकरांना वाटेल की जवळपास माणसं आहेत आणि हा उपाय यशस्वी ठरला.
 
मागील वर्षात जनावरांनी बटाटे, टोमॅटो आणि गव्हाच्या शेतीचे मोठे नुकसान केले होते त्यामुळे अनेक शेतकरी दिवाळखोर झाले. यापासून वाचण्यासाठी शेतकर्‍यांनी केलेले सर्व उपाय अयशस्वी ठरले होते. 24 तास पाळत ठेवणे, भांडी वाजवणे, सिंह आणि इतर जनावरांची आवाज रिकॉर्ड करून वाजवणे व इतर उपाय केले गेले. पण सर्व अयशस्वी ठरले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi