Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेव्हिड हेडलीची ‘ऑनलाइन’ साक्ष पुन्हा सुरु

डेव्हिड हेडलीची ‘ऑनलाइन’ साक्ष पुन्हा सुरु
मुंबई , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (11:15 IST)
तिसर्‍या दिवशी तांत्रिक बिघाडामुळे थांबलेली लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याची साक्ष घेण्याची प्रक्रिया आज चौथ्या दिवशी सकाळी साक्ष पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येत आहे.
 
मुंबईवरील भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला आणि माफीचा साक्षीदार बनलेला  लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याची साक्ष घेण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य करीत असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारच्या सुनावणीदरम्यान हेडलीने न्यायालयाला दिली असल्याने ही साक्ष महत्वपूर्ण मानली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi