Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. सिंग-मोदी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

डॉ. सिंग-मोदी यांच्यात ‘चाय पे चर्चा’
दिल्ली , गुरूवार, 28 मे 2015 (10:27 IST)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांचे निवासस्थान गाठल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपा आणि कॉँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही या ‘चाय पे चर्चा’ भेटीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.

काँग्रेसच्या एका कार्यक्रमात डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. इतर प्रकारांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार ग्भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी असंख्य घोटाळ्यांविषयी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी हे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग आणि मोदी यांच्यात सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मोदी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सिंग हे ७, रेसकोर्स या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते, असे कॉँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi