Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ड्रॅगनच्या कुरापती सुरुच, लडाखमध्ये हजार चीनी सैनिक घुसले

ड्रॅगनच्या कुरापती सुरुच, लडाखमध्ये हजार चीनी सैनिक घुसले
लेह , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (16:12 IST)
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौर्‍यावर असतानाच चीनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. लडाखच्या चुमार सेक्टरमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हजार सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार चीनी सैन्य चुमार सेक्टरच्या डेमचोक परिसरात घुसले आहेत. त्यांनी भारतीय सीमेच्या अनेक किलोमीटर आत घुसखोरी केली आहे. चीनी सैन्याच्या तीन तुकड्यांनी लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल ओलांडली सुमारे 1000 चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे.

चीनी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याच्या काही तुकड्या रवाना झाल्या आहेत.  
चीनी सैनिकांनी एका नदीवर सुरु असलेले कामही बंद पाडले आहे. यामुद्यावर  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बैठक बोलावली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi