Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताजमधून ओलिसांची सुटका, दहशतवादी ठार

ताजमधून ओलिसांची सुटका, दहशतवादी ठार

भाषा

मुंबई , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2008 (08:10 IST)
दक्षिण मुंबईतील पंचतारांकीत ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी बंधक ठेवलेल्या नागरीकांची लष्कराने सुरक्षित सुटका केली असून दोन अतिरेक्यांना यमसदनी पाठविले आहे.

ताजमहल हॉटेलमध्ये 40 मृतदेह सापडले असून त्यामध्ये 3 रिशे‍प्शनिस्टांचा समावेश आहे. या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले आहेत. लष्कराने आपले कोंबिग ऑपरेशन सुरू केले असून प्रत्येक खोली तपासण्याचे काम सुरू आहे.

युरोपीय खासदार बेपत्ता: मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अडकलेले युरोपीय खासदार सज्जाद करीम गोळीबारातून बचावले आहेत. परंतु, अजून त्यांचा काही शोध लागला नाही. ते बेपत्ता आहे.

38 वर्षीय करीमने मोबाइलची बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांपासून आपला जीव वाचविण्यासाठी मी हॉटेलच्या तळघरात लपलो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi