Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागांचा आज निकाल

तीन लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागांचा आज निकाल
नवी दिल्ली , मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (09:21 IST)
देशातील तीन लोकसभा आणि दहा राज्यातील 33 विधानसभेच्या 33 जागासाठी 13 सप्टेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीची आज (मंगळवार) मतमोजणी होणार आहे.
 
गुजरातमधील बडोदा, उत्तर प्रदेशातील मैनपुरी आणि तेलंगणांमधील मेढक या लोकसभेच्या तीन जागासाठी शनिवारी मतदान झाले. तर गुजरात, उत्तर प्रदेशासह अन्य राज्यातील दहा विधानसभेच्या 33 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त होता. सर्वांत जास्त उत्सुकता गुजरात आणि उत्तर प्रदेशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे की नाही. हे या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi