Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादी हल्यात 3 ठार

दहशतवादी हल्यात 3 ठार
श्रीनगर , मंगळवार, 26 मे 2015 (10:51 IST)
काश्मिरात दूरसंचार निगमच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्यांध्ये तिघांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक जवान ठार झाला. एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. लष्कराच्या एका गस्तीवर असलेल्या पथकावर दहशतवाद्यांनी  गोळीबार केला.
 
यामध्ये एक जवान मृत झाला. यावेळी लष्कराने जोरदार कारवाई करीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. दरम्यान, बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे दूरसंचार निगमच्या एका कार्यालयावर झालेल्या हल्यात येथील तीन कर्मचार्‍यांना दहशतवाद्यांनी ठार केले. या परिसरात मोबाईल ट्रान्समिशन टॉवर लागले असल्याने दहशतवाद्यांनी हे कार्यालयात लक्ष्य केल्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi