Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीत दहशतवादी हल्याची शक्यता

दिल्लीत दहशतवादी हल्याची शक्यता
दिल्ली , गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (10:36 IST)
जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने दिल्लीतील हॉटेल्समध्ये दहशतवादी हल्याची आखणी केली असल्याचा अहवाल भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे. २६/११ हल्याप्रमाणेच भारतात पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.
 
पाकिस्तानमधील हल्याला भारताची मदत असल्याचा कांगावा हाफीजने केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ‘अमेरिकेला मदत करण्यासाठी भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवू शकतो, तर काश्मिरी नागरिकांच्या मदतीसाठी जिहादींनाही भारतात घुसण्याचा अधिकार आहे, असे सईदने म्हटले आहे.
 
दरम्यान, हाफिज सईदच्या जमाद उद दावा या संघटनेला अमेरिकेने २००८ मध्ये काळ्या यादीत टाकले असून, सईदवरही १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.  पाकिस्तानात वारंवार सभा आणि मोर्चे काढत तो भारताविरुद्ध गरळ ओकत असतो. त्याच्या कृत्यांना पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. पाकिस्तानातील हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-आग्रा महामार्गावरील दोन हॉटेलमध्ये हल्ला करण्याची तयारी केल्याचे गुप्तचर विभागाने अहवालात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi